अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून केली विकास कामाबद्दल केली चर्चा.
मधुकर गोंगले, उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांनी त्यांची भेट घेतली असून अहेरी परिसरातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान कंकडालवार यांनी अहेरी तालुक्यातील प्रमुख समस्या व नागरिकांच्या गरजांचा आढावा जिल्हाधिकारी पंडा यांच्यासमोर मांडला.पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न यावर चर्चा करताना त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी पंडा यांनी उपस्थित समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन दिले.या भेटीमुळे स्थानिक विकासाला नवे बळ मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, सुरेखा आलम माजी सभापती पंचायत समिती अहेरी,नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार अहेरी, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा कंकडालवारांचे स्वीय सहाय्यक कार्तिक तोगम, स्वप्नील मडावी, नरेश गर्गम्, प्रमोद गोडसेलवार प्रवीण कोरेत, पिंटू मडावी आदी उपस्थित होते.

