अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ७ ऑगस्ट:- शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख मंगेश गमे, शिवसेना सावनेर तालुकाप्रमुख मनोज कुहिटे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपविभागीय अधिकारी यांना नव्याने सुरू झालेल्या टोल नाक्यावर योग्य त्या सुविधा मिळण्याबाबत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालावर व टोल नाक्यापासून २० किलोमीटर परिसरातील गावकऱ्यांच्या वाहनावर टोल मुक्त करण्यात यावे आणि टोल नाक्यावर प्राथमिक उपचार व ॲम्बुलन्स २४ तास उपलब्ध ठेवण्यात यावी. याकरिता आवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना सावनेर तालुकाप्रमुख जितू बिंदानी, उपतालुकाप्रमुख गेंदलाल कमाले, सतीश नाईक, शिवसेना सावनेर शहर प्रमुख कपिल पांडे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत कामोने, अरुण राऊत, गौतम पाटील, भोजराज आचारी, उमेश उईके, गणेश तवले, सुरेंद्र पलेरिया व शिवसैनिक उपस्थित होते.

