आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 23 ऑगस्ट शनिवारला संत तुकडोजी वार्ड महाराणा प्रताप जिमच्या समोर हरी माऊली कॉलनी मित्र परिवार हिंगणघाट द्वारा भव्य तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता. या पोळयामधे शहरातील विविध प्रभागातील जवळपास 120 अधिक नंदीसह बालगोपाल उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हिंगणघाट डॉ. विशाल रुईकर, झोटिंग सर काबळे काकाजी, अक्षय, कपिल गोटे, विशाल, श्री. गिरडे, श्री. हिरडे काकाजी प्रभागातील वैशाली, सुनिता आणि कॉलनीतली मित्र परिवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाची पूजा करून सुरुवात करण्यात आली तसेच निरीक्षक म्हणून महिला पाहुणे मंडळींनी निरीक्षण करुन वेशभुषा व नंदी सजावट निवड करण्यात आली. त्या व्यतिरिक्त गटातील बालकांना प्रोत्साहनपर दोन बक्षिसे दिली. यावेळी मुलांना फळ फ्रुट, बिस्किटे, चिप्स व “एक नंदी एक गिफ्ट” देण्यात आले. वही व पेन्सिल, रंगाची पेन्सिल टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.
नंदी सजावट गटातील प्रथम बक्षिस स्वरुप तर वेशभुषा गटातील प्रथम झोटिंग यांची निवड करण्यात आली. डॉक्टर विशाल रुईकर अध्यक्षीय भाषण करुन कार्यक्रमाची सांगता केली. पाहुणे मंडळी, बालगोपाल व उपस्थित पालकवर्ग तसेच नागरीकांचे आभार मानले. या नंदी पोळ्याला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रुपेश अक्षय कपिल, आशिष कांबळे काका, अंशुल, निखिल, आशिष, गोलू पावडे व समस्त नागरीक मंडळी यांनी अथक प्रयत्न केले. या सर्वांमुळे कार्यक्रमात उत्साह निर्माण झाला.

