महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लोहारा:- येथून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथे एका नराधम मुलगा व सुनेने आपल्याच आईला मोठ्याप्रमाणात मारहाण केली यात तिचा अती रक्तस्त्राव होऊन आईचा जागीच मृत्यू झाला आहे. सौदागर सुरेश रणशूर आणि सून पूजा सौदागर रणशूर अशी आरोपी मुलगा आणि सुनेचे नाव नावे असून उमाबाई सुरेश रणशूर वय 55 वर्ष असे हत्या करण्यात आलेले महिलेचे नाव आहे.
आईची हत्या केल्यानंतर आरोपी लेक आणि सुनेने पोलीस आणि नातेवाइकांची दिशाभूल करण्यासाठी उमाबाई यांचा मृतदेह पंख्याला अडकवला यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, शवविच्छेदन अहवालात अती रक्तस्त्रावामुळे झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने या हत्येचा पर्दाफाश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास उमाबाई आणि सून पूजा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की मुलगा सौदागर आणि सून पूजा यांनी मिळून उमाबाई यांना बेदम मारहाण केली. यात उमाबाई यांच्या जबड्याला गंभीर मार लागल्याने तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कोणालाही कळू नये म्हणून आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला आणि मृतदेह पंख्याला लटकवला.
मृतक उमाबाई यांचा लहान मुलगा महेश सुरेश रणशूर याच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 10.00 वाजता मुलगा सौदागर आणि सून पूजा यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

