रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बदनापूर:- तालुक्यातील धोपटेश्वर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (१७ सप्टेंबर) निमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बदनापूर यांच्या वतीने धोपटेश्वर गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून ग्रामस्वच्छतेचा आदर्श घालून दिला.
या मोहिमेमुळे गावात ऐक्य, सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. गावकऱ्यांच्या वतीने आयटीआय बदनापूरचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

