मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय, हिंगणघाट, येथे “महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती” साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक हरीष भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरीले व मनीषा कोंडावार तसेच मार्गदर्शक शिक्षक मिलिंद सावरकर मंचावर उपस्थित होते.
मार्गदर्शनपर मनोगतातून मिलिंद सावरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोन्ही महामानवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रत्येक राष्ट्राची अस्मिता त्या राष्ट्रात घडलेल्या विविधांगी इतिहास आणि घडत असते हा इतिहास व अस्मिता सतत जागी राहिली तरच राष्ट्राचे मन तरुण राहते व त्यांचे कर्तुत्व फुलते दोन्ही महामानवांच्या जयंती निमित्ताने त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे व त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजे.
याप्रसंगी स्वदेशी सप्ताह निमित्त स्वदेशी सप्ताह अंतर्गत ‘देशाला स्वावलंबी बनवायचे असेल तर स्वदेशीचा वापर करावा’ असे मत शुभांगी धात्रक यांनी व्यक्त केले. सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी सत्य अहिंसा आणि स्वदेशीचा वापर आपण सर्वांनी करावा असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून शाळेचे मुख्याध्यापक हरीष भट्टड यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन हर्षाली वरोकर यांनी केले. जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

