मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नगरपरिषद कॉलनीतील श्री हनुमान मंदिराजवळ २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय श्रीमद् सनातन भागवत कथा महोत्सवामुळे शहरात अभूतपूर्व धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धेय श्री सुरेशशरण शास्त्री महाराज आपल्या तेजस्वी आणि मधुर वाणीने कथावाचन करत असून, भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करत आहेत.
कथा महोत्सवाची सुरुवात शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी मुख्य मार्गावरील बालाजी मंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य मंगल कलश यात्रेने झाली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून कथास्थळी श्री हनुमान मंदिर, नगरपरिषद कॉलनी येथे पोहोचली. या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
प्रति दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कथेचे वाचन होत आहे. पूज्य सुरेशशरण शास्त्री यांच्या मधुर आवाजातील सुंदर चित्ररथांनी भागवतांच्या अनेक कथा पूर्ण होत आहेत. यात परीक्षित महाराजांचा जन्म, ध्रुव चरित्र, भक्त प्रल्हादची कथा आणि भगवान नरसिंहाचा अवतार यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगांचा समावेश आहे. कथा समिती कडून आगामी दिवसांसाठी कृष्णजन्म, वामन अवतार, ५६ भोग, रुक्मिणी विवाह आणि सुदामा चरित्र इत्यादी विशेष कथांचे अभूतपूर्व सुंदर नियोजन करण्यात आले आहे. भागवत कथा महोत्सव समितीकडून सर्व भाविक भक्त, पुरुष व महिलांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कथेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कथेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
यावेळी कार्यक्रमात चंदीराम नैनानी, श्रीचंद कोचर, प्रेम बसंतानी, डॉ. आदर्श गुजर, राजभाऊ गौळकार, रविंद्र गोयनका, मनोज चंदाराणा, प्रदीप जोशी, भरत रूपारेल, हरिओम अग्रवाल, श्याम घोड़वैद्य, विशाल ब्राह्मणकर, टोनी मोटवानी, राजेश कोचर, गौरव बतरा, देवा जोशी, मुकुंद सांगाणी, राकेश शर्मा, चंदीराम नैनानी, गोविंद त्रिवेदी, हरिश त्रिवेदी, बंटी येनपुतवार, प्रमोद येडलेवर, किशोर सिंगरु, दिलीप आदेवार व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

