नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था गडचांदुर तर्फे आयोजन.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चैतन्य गगनगिरी नाथाय नमः शिक्षण प्रसारक द्वारा संचालित स्वर्गीय अनंतराव चटप प्राथमिक आश्रम शाळा, गडचांदुर येथील अधीक्षक गोपाल कुरेकर यांच्या वाढदिवसानिमित्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पायमोजे भेट देण्यात आले.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपना तालुका महिला सचिव तथा आश्रम शाळेच्या अधीक्षक सुलभा कुरेकर व महिला पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक नागेश अनंतराव चटप, आशा एकरे मुख्याध्यापिका, अनिल देवलवार, विशेष सहाय्यक, भारतीय स्टेट बँक शाखा लखमापूर, नरेंद्र देशकर, उपाध्यक्ष नेफडो, सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला उपाध्यक्ष, उषा टोंगे, कोरपना तालुका महिला अध्यक्षा, पंडित काळे, नागपूर विभाग सचिव नेफडो आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीत संध्या वाघाडे यांनी सादर केले. यावेळी स्वर्गीय अनंतराव चटप प्राथमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन विषयावर पथ्यनाट्य सादर केले. तसेच नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या अरुणा सालवटकर, सचिव, विजया नामेवार, शीतल धोटे, किरण अहिरकर, माया टिकले, सीमा वरारकर, वंदना मोरे, मनिषा काळे, सविता विहिरे, शीला शेट्टी , मनोज तेलीवार, मनोज कोल्हापूरे, रवी बुटले, सुवर्णा बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता विरूटकर यांनी केले. प्रास्ताविक संघमित्रा ताकसांडे यांनी तर आभार लीना लांजेकर यांनी मानले.

