प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथे बाल दिनानिमित्त व शहीद दिनाच्या निमित्ताने भारतासाठी बलिदान दिलेल्या चार साहेबजाद्यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्राच्या रक्षणासाठी चार साहेबजाद्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा संदेश देत हा दिवस ‘बाल दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सेवाभाव, देशभक्ती आणि बलिदानाची प्रेरणा समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बाल दिनानिमित्त दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गुरुद्वारा श्री गुरुनानक संगत साहेब प्रबंध कमिटी, वडनेर यांच्या वतीने विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे उपचार घेत उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी फळांचे वितरण करण्यात आले. यासोबतच वडनेर येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुध, बिस्किटे व फळांचे वितरण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पुतळ्याजवळ नागरिकांसाठी दुधाचा लंगर तसेच बिस्किटे व फळांचे वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य व मानवतेचा संदेश पोहोचला व पोचण्याच्या उद्देशाने एकते संदेश देण्यात आला.
यावेळी विविध ठिकाणी चार साहेबजादे यांच्या बलिदानाची प्रतिमा प्रदर्शित करून त्यांच्या अद्वितीय योगदानाची माहिती देण्यात आली. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अस्मितेसाठी“चार साहेबजाद्यांनी दिलेल्या बलिदानाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले” चार साहेबजादे यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव बाल दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
“बाल दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व वडनेर ग्रामपंचायत येथे प्रतिमा देण्यात आले तसेच हिंगणघाट येथे नेतेमंडळी यांना सुद्धा चार साहेबजादे यांची प्रतिमा भेट देण्यात आल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे नेते व सभापती सुधीर कोठारी, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, निमू घटवई वडनेरचे अध्यक्ष राजेंद्र डागा, ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाटचे अध्यक्ष गिरधर राठी, तसेच इंदिरा गांधी विद्यालय वडनेरचे अध्यक्ष कृष्णाजी महाजन यांना प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
या सर्व उपक्रमांचे आयोजन गुरुद्वारा श्री गुरुनानक संगत साहेब प्रबंध कमिटीच्या पदाधिकारी गुरुद्वारा अध्यक्ष गुरुमुखसिंह जुनी, उपाध्यक्ष गुरुदयालसिंह जुनी माजी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, कोषाध्यक्ष संगतसिंघ जुनी, सचिव सेवकसिंघ बावरी, कार्याध्यक्ष विजेंद्रसिंघ जुनी, प्रवक्ता रायबहादुरसिंघ जुनी, संघटक प्रेमसिंघ जुनी, ग्रंथी जर्नलसिंघ टाक, संघटक सेवकसिंघ जुनी, मायासिंघ टाक, गोलूसिंघ टाक, अर्जुनसिंघ जुनी, जयदेव सिंघ बावरी, निशानसिंघ जुनी गुरुद्वारा कमिटी वडनेर च्या पुढाकाराने कार्यक्रम करण्यात आले असून उपस्थित नागरिक, महिला, विद्यार्थी वर्ग व सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

