खासदार अमर काळे यांनी अन्नत्याग आंदोलन स्थळी भेट देवून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याविषयी बैठक घेण्याची केली मागणी.
अन्नत्याग उपोषणकर्त्यांना काही कमी जास्त झाल्यास त्याचे जबाबदार शासन, प्रशासन राहील असे महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला खासदार अमर काळे यांनी भेट देवून अन्नत्याग उपोषणकर्त्यांची विचारपूस करीत जिल्हाधिकारी यांनी यावेळी याविषयी तात्काळ बैठक घेण्याची केली मागणी. अन्नत्याग आंदोलनाच्या – दिवस दुसरा असून अन्नत्याग उपोषणकर्त्यांना काही कमी जास्त झाल्यास त्याचे जबाबदार शासन प्रशासन राहील असे महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील कलोडे चौक येथील अवैद्य झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात २०१२ पासून प्रशासनाला संत तुकडोजी वार्डातील नागरिक मागणी करीत आहे. सर्वे क्र. १७६/२ (कलोडे सभागृह समोर) संत तुकडोजी वार्ड मौजा पिंपळगाव या जागेवरील अवैद्य झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात कोर्टाचा आदेश जून २०१७ व जुलै २०२२ रोजी चा असून सुद्धा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. या संदर्भात स्थानिक नागरीकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दि. २९ जून २०२५ रोजी निवेदन दिले. नंतर जिल्हाधिकारी यांना दि. १४ जुलै २०२५ रोजी निवेदन दिले. व त्याच बरोबर ०१ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले. या आंदोलन दरम्यान प्रशासनाने २० दिवसाच्या आत कारवाई करून अवैद्य झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु आतापावतो प्रशासनाने काहीही केलेले नाहीत.
शहरातील कलोडे सभागृह समोरील अवैद्य झोपडपट्टी अतिक्रमण धारकांच्या दुसरीकडे पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. झोपडपट्टी हटाव संघर्ष समिती व संत तुकडोजी वार्ड रहिवासी यांच्या वतीने हे आंदोलन गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू आहे. तथापी प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर संघर्ष समितीने सहाव्या दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना नैतिक आधार देत आहेत. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार उपोषनकर्त्यानी घेतलेला आहे.
अन्नत्याग आंदोलनावर जे उपोषणकर्ते बसलेले आहेत. त्यांच्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासनाची राहील. यानंतर सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांचे जबाबदार सुद्धा शासन / प्रशासन राहील असे निवेदन महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेते व स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शेतकरी नेते अनिल जवादे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उपासे, माजी नगरसेवक मोहम्मद रफीक, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक अशोक पराते, शहराध्यक्ष बालू वानखेडे, कार्याध्यक्ष अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, राजेश भाईमारे, सीमा तिवारी, मीना सोनटक्के, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, परम बावने, सुरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम कांबळे, पंकज भट, सूरज खोंडे, अमित रंगारी, विजय हजारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

